Startup Basics Doodle Illustration of Orange Word and Stationery Surrounded by Doodle Icons. Business Concept for Web Banners and Printed Materials.

स्टार्टअप बेसिक्स – फंडामेंटल्स

 स्टार्टअप हा बराच परिचयाचा शब्द झाला आहे, पण स्टार्टअप म्हणजे काय ? तो सुरू कसा करायचा ? त्यास मार्गदर्शन कोण करेल ? फंड कुठून उभा करायचा? असे एक ना अनेक प्रश्न युवा पिढी समोर आहेत त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ही मार्गदर्शन सिरिज सुरू करीत आहोत. याच सिरिज मधील हा भाग १ स्टार्टअप बेसिक्स.

प्रथमत: आपण याचा स्विकार करूया कि आपल्याकडे स्वत:चा व्यवसाय, उद्योग सुरु करण्याची संस्कृती नाही, विद्यार्थ्यांकडे शिक्षण घेत असताना एकच ध्येय डोळ्यासमोर असतं ते म्हणजे उत्तम नोकरीसाठी जे करावं लागेल ते करू आणि त्या प्रमाणेच स्वत:ला तयार करू. मग तो महाविद्यालयीन विद्यार्थी असेल अथवा एखादा पदवीधर , दोघांची स्वप्नं सारखीच !! मग हि स्वप्नं साकार करण्यासाठी धडपड सुरु असते काही मंडळी यात यशस्वी होतात आणि त्यांना त्यांचा ड्रीम जॉब मिळतो आणि काही मंडळी मिळालेल्या गोष्टीत समाधान मानतात….. पण स्व-उद्योग हि संस्कृती अंगिकारायची असल्यास काय करावं लागेल? याविषयी शैक्षणिक धोरणात ठोस अभ्यास, निर्णय नसल्यानं असावं बहुधा, पण या विषयी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून प्रेरणा देणे गरजेचे आहे. कल्पना आणि निर्मिती हे शिक्षणाचे मुलभूत भाग आहेत तसेच नव्या उद्योगासाठी देखील ते तितकेच महत्वाचे आहेत. आजची पिढी प्रगत आहे, या पिढीस सुरुवातीपासूनच टेक्नोलॉजीचा वापर करण्याची सवय आहे, हा वापर फक्त योग्य दिशेने केला कि त्याची फळ मिळू शकतात हे समजून सांगणे आवश्यक वाटते. आजूबाजूस घडणाऱ्या गोष्टींवर नजर ठेवली आणि अभ्यास केला तर डोक्यात नव-कल्पनांचा जन्म होऊ शकतो आणि त्यातून नव-निर्मिती घडू शकते. हे अनेक उदाहरणातून सिद्ध झालं आहे. कल्पनांचा नवोन्मेष साध्य करणे हेतू याची चर्चा घडवून आणणे, त्यातील बारकावे शोधणे , व्यवहार्यता तपासून पाहणे याची पारायणे जाणकार व्यक्तिंसोबत करावी लागतील, तेवढा संयम अंगी बाणावा लागेल, तो आवश्यक आहे.

          “चक दे इंडिया” हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल, त्यात कोचची भूमिका केलेल्या शाहरुखने टीमला शिकविलेले फंडामेंटल्स ध्यानात घेऊयात. कारण कोणत्याही खेळात आनंद तर मिळतोच पण बेसिक्सला तेवढेच महत्व असते. ते विसरून, स्किप करून पुढे जाता येत नाही. यशस्वी होण्यासाठी “आवश्यक तयारी व सराव” या दोन्ही गोष्टी यशाचा आनंद घेण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करतात. स्टार्टअप सुद्धा त्यास अपवाद नाही. बहुधा नवा उद्योग सुरु केलेली मंडळी हेच बेसिक ध्यानात घेत नाहीत, ते सतत नव्या गोष्टींच्या मागे असतात, मराठीत म्हणतात ना “हातचं सोडून पळत्याच्या मागे” असा काहीसा प्रकार होतो. टेक्नोलॉजीमुळे आजकाल आपणांस बरीच माहिती मिळते पण सुरु केलेल्या उद्योगात येणाऱ्या एखाद्या अडचणीसाठी कोणताच जादुई दिवा अथवा कांडी नाही जी फिरवली कि अडचण दूर होईल. अडचण दूर सारण्यासाठी सराव, तुमचं त्याप्रती समर्पण, विषयातील प्रभुत्व, विकसित करण्याचे ध्येय हेच तुम्हाला मदत करतील सोबतच मुलभूत तत्वं आणि प्रभुत्व मिळविण्याचे मार्ग तुमचा यशाचा मार्ग निश्चित करतील.

          पुढील भागात आपण बेसिक्सची पूर्ण माहिती घेऊया.

अमित बाळकृष्ण कामतकर

ब्लॉगर, सल्लागार, लेखक, सॉफ्ट स्किल ट्रेनर, व्याख्याता

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *